या ठिकाणी पहा 10 वी चा निकाल

दुपारी 1 वाजता जाहीर होणार निकाल

10 वीच्या निकालासंदर्भात काय म्हणतात शालेय शिक्षण मंत्री व्हीडिओ पहा !

टीम : ईगल आय मीडिया

राज्य मंडळाचा दहावीचा निकाल आज शुक्रवार १६ जुलै २०२१ रोजी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे.

http://result.mh-ssc.ac.in/

सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.

सन २०२१ च्या दहावीच्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येईल. यंदा करोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

कसा तयार झाला निकाल? इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा/अंतर्गत मूल्यमापन आदींच्या आधारे माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण दिले आहेत. त्यानुसार मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे.

2 thoughts on “या ठिकाणी पहा 10 वी चा निकाल

Leave a Reply to Suraj Cancel reply

error: Content is protected !!