तळई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबाना केंद्राची 2 लाख रुपयांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले.

टीम : ईगल आय मीडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगडमधील तळई गावातील दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०,००० रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोंदींनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे असे म्हणत ट्विट केले आहे.

“महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा.  महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेक काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील मंत्रालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे.

One thought on “तळई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबाना केंद्राची 2 लाख रुपयांची मदत

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!