पंढरपूर : ईगल आय मीडिया
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी यासंदर्भात १५ मंत्री, १३ खासदार, ११७ आमदारांचे समर्थन पत्र शिक्षक आमदारांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना सादर केले असून १० जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत अशी माहिती मा आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.
मंगळवारी मुंबई येथे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षक व पदवीधर आमदार यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत चर्चा केली. यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, मा आ दत्तात्रय सावंत, आ.सुधीर तांबे, मा आ.सतीश चव्हाण , मा आ.श्रीकांत देशपांडे,
शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज मो अभ्यंकर व आ कपिल पाटील, आ. किशोर दराडे यांची महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
१० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या अन्यायकारक अधिसूचनेला सर्वच स्तरावरून विरोध केला जात आहे. लाखो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अधिसूचना रद्द व्हाव्यात यासाठी ईमेल द्वारे, पोस्टाद्वारे आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती, पुरोगामी शिक्षक संघटना व महाराष्ट्रातील इतर अनेक संघटनांनी अधिसूचना रद्द करणे संदर्भात आक्षेप शासनापर्यंत पाठविला आहे.
आता तर महाराष्ट्रातील १५ मंत्री, १३ खासदार, ११७ आमदारांनी १० जुलै २०२० ची अधिसूचना रद्द करण्यासाठी तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी यासाठी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना समर्थन पत्र दिले असल्याचे मा आ दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.
पेशन्स चा प्रश्न सोडवता आला नाही तर नवखे ,कोणत्याही पक्षाशी संबंधीत नसलेल्या, आमदार झाल्यावर आपल्या प्रश्न प्रथम प्राधान्याने सोडविणारे,प्रश्न सुटेपर्यंत आमदार पेंशन नाकारणारे, पद्वीधर,शिक्षक उमेदवारांना निवडून द्यावे यांंनी फक्त आणि फक्त आपल्या चिघळलेल्या जखमांचे खवले काढण्याचे काम केले आहे, आणि पुढे आपलीच राजकीय सोय होण्यासाठी हा प्रश्न तेवत ठेवला आहे यांना लाखोचे मानधन, आमदार निधी आहे आणि तो ही आपण भरलेल्या करातूनच लाजा वाटत नाहीत या अधिकार्यांना अरे असा कायद्याचा खिस काढून पैसे वाचवायाचे असतील तर यांनी फक्त पगारी नोकरी प्रामाणिक पणे करा आणि हिम्मत आणि लाजा असतीलच तर कोणतेही आर्थिक लाभ न घेता फक्त आणि फक्त पगारावर नोकरी करा जनतेचे हजारो कोटी रुपयांची बचत तुम्ही करू शकता कोणाचाही पोटावर पाय न देता आणि विधमान आमदार, खासदार, मंत्री, संत्री, यांनी एक करा आम्हाला आजिबात पेशंट देऊ नकाच पण एक करा आपल्या पोराबाळांना ,आई-वडीलांना स्मरून तुमचीही स्वत:ची पेशंन नाकारा आणि मगच निधड्या छातींनी आपल्या पोरांंबाळांच्या समोर जावा कंसात आपल्या संपत्तीचा हिशोबाने हे
करा कारण पेशंन मिळाली नाही तर आजपर्यंत कोणताही माजीमंत्री, माजी आमदार, माजी खासदार रस्त्यावर भीक मागून फिरत आहे असे उदाहरण नाही