उद्यापासून दररोज 2 हजार विठ्ठल भक्तांना दर्शन मिळणार

मंदीर समितीने online बुकिंग मर्यादा वाढवली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्री विठ्ठल भक्तांची मागणी लक्षात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने online बुकिंग ची संख्या 1 हजारावरून 2 हजार केली आहे. त्यामुळे उद्या ( गुरूवार ) पासून दररोज 2 हजार भाविकांना विठ्ठलाचे दर्शन मिळणार आहे. याबाबत आज मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

श्री विठ्ठलाचे मंदिर भाविकांसाठी खुले झाले असले तरी दररोज 1 हजार भाविकांना ऑनलाइन दर्शन बुकिंग करून मुखदर्शन देण्यात येत आहे. 8 महिने भाविकांसाठी बंद असलेले विठ्ठल मंदिर राज्य सरकारच्या आदेशानंतर सोमवारपासून विठ्ठल मंदिर खुले करण्यात आले आहे. . त्यानुसार दररोज सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत दर तासाला केवळ 100 लोकांनां मुख दर्शनासाठी सोडण्यात येतआहे.

भाविकांना online बुकिंग करावे लागणार असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांनाच तपासणी करून मंदिरात सोडले जात आहेत. गरोदर महिलांना ही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. सर्व भाविकांना श्री विठ्ठल आणि रुक्मिणी चे केवळ मुख दर्शन दिले जात आहे.

मंदिरात आल्यानंतर भाविकांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे, त्यावेळी तापमान संशयास्पद आदळून आले तर प्रवेश नाकारण्यात येणार आहे. भाविकांना स्यानेटाईझर मंदिर समिती कडून पुरवला जात आहे. मात्र भाविकांची संख्या वाढत असून online बुकिंग चे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 18 नोव्हेंबर पासून दररोज 2 हजार भाविकांना onlineबुकिंग करून दर्शन घेता येणार आहे.

One thought on “उद्यापासून दररोज 2 हजार विठ्ठल भक्तांना दर्शन मिळणार

Leave a Reply

error: Content is protected !!