एकलासपूर जवळ टेम्पोच्या धडकेत युवकाचा मृत्यू

तर 1 जण गंभीर जखमी

पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूरहून परत येत असताना एकलासपूर जवळ पाठीमागून टेम्पोने जोराची धडक दिल्याने तात्यासो तुळशीराम चौगुले (वय.28, रा.मल्लेवाडी ता.मंगळवेढा) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश गोडसे (वय 28 रा.सिद्धेवाडी ता.पंढरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाला आहे.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत तात्यासो चौगुले व त्याचा मित्र, गणेश गोडसे हे दोघे मित्राची आई आजारी आहे, तिला पाहण्यासाठी पंढरपूर येथे गेले होते.
पंढरपूरहुन परत मंगळवेढ्याकडे येताना एकलासपूरजवळ पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने तात्यासो चौगुले जागीच मयत झाला.


गणेश गोडसे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मयत तात्यासो चौगुले त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!