कोरोनाची दहशत झुगारून उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले चक्री वादळ पीडितांच्या मदतीसाठी !

पुणे : ईगल आय मीडिया

गुरुवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आलेल्या चक्र वादळाने नुकसान झालेल्या भागास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली.
अजितदादानी जुन्नर तालुक्यातील अनेक गावांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या.
राज्यात कोरोना साथीचा कहर सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी थेट गावा गावात आणि शेताच्या बांधावर जाऊन केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत खा अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके आदींसह अधिकारी उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यात चक्री वादळामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर शेतातील पिकांचेही नुकसान झाले असून वादळ शमल्या च्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार नुकसान ग्रस्त भागात पोहोचले.
कर्तव्यदक्ष आणि जाग्यावर निर्णय घेणारे, प्रश्न तातडीने सोडवणारे नेते म्हणून अजितदादांची ओळख आहे.

या पाहणी दौऱ्यातही अजित पवारांच्या या लौकिकाचे दर्शन झाले.
यावेळी अजितदादांनी थेट जनतेशी विचारपूस करून त्यांच्या अडचणी ऐकल्या आणि अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना केल्या. दोन दिवसांत पंचनामे झाले पाहिजेत, 30 जून अखेर नुकसानभरपाई द्यावी लागेल अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या.
अजितदादांनी वादळ ग्रस्त भागास भेटी देऊन पाहणी केली आणि प्रशासन कामाला लावल्यामुळे वादळग्रस्त भागातील जनतेला दिलासा दिला आहे..
त्याचबरोबर कोरोनाची भीती न बाळगता सावधानता बाळगून आता त्याच्यासोबत जगायला सुरुवात करा असाही संदेश कृतीतून दिला आहे..
अजित दादांच्या या कृतिशीलतेतून धडा घेऊन मागील अडीच महिन्यापासून घरात बसलेले इतर मंत्री , लोकप्रतिनिधी घराबाहेर पडतील अशी अपेक्षा मात्र व्यक्त होऊ लागली आहे.

2 thoughts on “कोरोनाची दहशत झुगारून उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले चक्री वादळ पीडितांच्या मदतीसाठी !

Leave a Reply to Team Eagleeye Cancel reply

error: Content is protected !!