शिवाजी काटवटे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पंढरपूर : ईगल आय मीडिया
गुरसाळे ( तालुका पंढरपूर ) येथील शिवाजी मारुती काटवटे ( वय 41) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रविवारी दुपारी निधन झाले. दुपारी करकंब येथे रक्तदान केले होते. त्यानंतर त्यांना चक्कर आल्याने पंढरपुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी जाहीर केले.

त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन भावजय, पत्नी, दोन मुले असा परिवार होत. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर रविवारी रात्री  अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी काटवटे यांनी दै. लोकमत च्या पंढरपूर कार्यालयात काही वर्षे सेवा केली होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

One thought on “शिवाजी काटवटे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

  1. दुर्दैवी घटना, भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!