स्वेरीच्या 5 विद्यार्थ्यांची सिंटेल कंपनीत निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

‘सिंटेल’ या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.


‘सिंटेल’ या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून सनम कुबेरदास मस्के, अक्षया अर्जुन शेरकर, विद्या शिवाजी खडके, मुजम्मील सलीम शेख, व धनराज तुकाराम पाटील या पाच विद्यार्थ्यांची निवड केली.

श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व प्रा.एस.व्ही. दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या पाचही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

One thought on “स्वेरीच्या 5 विद्यार्थ्यांची सिंटेल कंपनीत निवड

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!